बुधवार, ४ जून, २०१४

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 48 – नीसर्गाने मानवाला दीलेल्या संगीत-जाणीवा आणी मानवाने त्याचा केलेला वापर.

युनिकोड ते साऊंडकोड लेख 48 –
नीसर्गाने मानवाला दीलेल्या संगीत-जाणीवा आणी मानवाने त्याचा केलेला वापर.

(नावे सोडुन लेखनात एक-वेलांटी एक-उकार वापरले आहेत, म्हणजेच शुद्धलेखन-नीयमावली झीडकारली आहे)

भारतीय संगीतात 'सा' हा कोणत्या फ्रीक्वेन्सीचा नीवडावा ते गायक ठरवु शकतो. फ्रीक्वेन्सी दुप्पट झाली तर पहील्या नादासारखाच आभास होतो हे नीसर्गाने मानवावर लादलेले तंत्र आहे. तसेच मानवाला 85 ते 1100 एवढ्याच पट्टीतील फ्रीक्वेन्सी उच्चारता येते. या फ्रीक्वेन्सीत जास्तीतजास्त तीन सप्तके बसु शकतात म्हणुन गायकाला केवळ यातुनच संगीत साकारावे लागते. केवळ गणीती पद्धतीने वीचार केला तर मानवाला गायकीसाठी कोणती तीन फ्रीक्वेन्सीचे संच तीन सप्तके म्हणुन उपलब्ध असतात ते पाहु. यातुन पहील्या 'सा'ची तीन सप्तके नीर्माण होण्यासाठीच्या फ्रीक्वेन्सी व्याप्ती केवळ लक्षात येइल. गायनात कोणती तीन सप्तके कोणत्या फ्रीक्वेन्सीची वापरली जातात? आणी ती तशीच का? या अभ्यासाची ही सुरवात ठरते.

समजा पहील्या सप्तकातील 'सा' सुर हा 85 फ्रीक्वेन्सीचा असला तर दुसर्‍या-सप्तकातील 'सा' सुर हा 170 फ्रीक्वेन्सीचा ठरतो. 85 ते 170 या फ्रीक्वेन्सीतील व्याप्तीत 85 फ्रीक्वेन्सी ही पहील्या सप्तकाची सुरवात व 170 फ्रीक्वेन्सी हा त्याचा शेवट ठरतो. यातील 85 फ्रीक्वेन्सी ही पहील्या सप्तकाची सुरवात ठरते व 170 ही फ्रीक्चेन्सी त्यानंतरच्या फ्रीक्वेन्सीची सुरवात ठरते. म्हणजेच पहीले सप्तक हे 85 ते 170 फ्रीक्वेन्सीचे म्हणावे लागले तरी त्यात 170 ही फ्रीक्वेन्सी जोडलेली नसते कारण 170 ही फ्रीक्वेन्सी ही नंतरच्या सप्तकाची सुरवात ठरते. म्हणजेच पहील्या सप्तकाच्या फ्रीक्वेन्सीचे यथोचीत वर्णन ''85 ते 170च्या अलीकडे'' असे असते.

अशा प्रकारे जर पहील्या सप्तकातील 'सा' हा 85 फ्रीक्वेन्सीचा धरला तर मानवाला (1) ''85 ते 170च्या अलीकडे'', (2) ''170 ते 340च्या अलीकडे'', (3) ''340 ते 680च्या अलीकडे'' अशी तीन सप्तके गायकीसाठी प्राप्त होतात. कारण त्यानंतरचे चौथे सप्तक ''680 ते 1380च्या अलीकडे'' हे सप्तक मानवाला उच्चाराच्या शक्य असलेल्या 1100 फ्रीक्वेन्सी ओलांडते.

आपण जशी सप्तकाच्या सुरवातीची फ्रीक्वेन्सी 85 धरुन वरील गणीत मांडले तसेच गणीत तीसर्‍या सप्तकाच्या शेवटची म्हणजे चौथ्या सप्तकाच्या सुरवातीची 'सा' सुराची फ्रीक्वेन्सी 1100 धरुन त्या अनुषंगाने तीन सप्तकाच्या फ्रीक्वेन्सी मांडु, आता त्या फ्रीक्वेन्सी जर पहील्या सप्तकातील 'सा' हा 137.5 फ्रीक्वेन्सीचा धरला तर मानवाला (1) ''137.5 ते 275च्या अलीकडे'', (2) ''275 ते 551च्या अलीकडे'', (3) ''551 ते 1100च्या अलीकडे'' अशी तीन सप्तके गायकीसाठी प्राप्त होतात. हे केवळ गणीती आकडेवारी आहे, यातुन गायकीला उपयुक्त ठरणार्‍या तीन सप्तकांचा शोध घेण्याच्या अभ्यासाठी सुरवात होते, हे कृपया लक्षात घ्यावे.
म्हणजे मानवाच्या गायकीसाठी तीन सप्तके उपलब्ध होण्यासाठी, पहील्या सप्तकाच्या 'सा' ची व्याप्ती ही 85 ते 137.5 फ्रीक्वेन्सी एवढी असावी लागते हे नक्की कळते.

माननीय भातखंडे सरांनी आणी श्रीनीवास सरांनी नीश्चीत केलेल्या तीन सप्तकांच्या फ्रीक्वेन्सीतील मध्य-सप्तकाची फ्रीक्वेन्सी 240 ते 452 4/43 अशी आहे. पाश्चात्य संगीताने नीयमीत केलेल्या तीन सप्तकांच्या फ्रीक्वेन्सीतील मध्य-सप्तकाची फ्रीक्वेन्सी 240 ते 450 अशी आहे.

गायकी आणी वाद्य यांच्या समन्वयातुन नीसर्गाने मानवाला संगीत जाणण्यासाठीची सोय उपलब्ध केली आहे. मानवाला 85 ते 1100 फ्रीक्वेन्सीचा ध्वनी उच्चारता येतो म्हणुन गायकीतुन केवळ तीन सप्तके गायकाला वापरता येतात. पण मानवाला 20 ते 20000 फ्रीक्वेन्सीचा ध्वनी ऐकु येतो म्हणुन वाद्यांतुन संगीतासाठी मानवाला सात सप्तकांचा वापर करता येतो. पाश्चात्यांनी नीर्माण केलेल्या पीयानो यातुन 30.8677 ते 3951.07 या फ्रीक्वेन्सीच्या टप्यातुन सात सप्तके मीळतात. पीयानोतील सात सप्तकांची फ्रीक्वेन्सी नीश्चीत केलेली आहे. भारतीय गायकीच्या मध्य-सप्तकाची माननीय भातखंडे सरांनी आणी श्रीनीवास सरांनी नीश्चीत केलेली फ्रीक्वेन्सी 240 ते 452 4/43 अशी आहे आणी पीयानोतील त्याच पातळीतील फ्रीक्वेन्सी 261.626 ते 523.251 ठरते.

88 चाव्यांच्या पीयानोतील चाव्यांवर पोस्ट केलेल्या प्रत्येक सप्तकातील 'सा' ची फ्रीक्वेन्सी दाखवणारा तक्ता व चीत्र –





आठव्या सप्तकातील 'सा'ची फ्रीक्वेन्सी 4186.01 असते.

पेटी (हार्मोनीयम) हे वाद्य, अलगुज (रीड) यातुन नीर्माण होणार्‍या कंपनातुन तर पीयानो हे वाद्य तारांच्या कंपनातुन संगीतातील सुरावट नीर्माण करते. मानवाला 20000 पर्यंतची फ्रीक्वेन्सी ऐकु येत असताना संगीतासाठी मात्र पीयानोसारख्या उपकरणातुन जास्तीतजास्त केवळ 4186.01 एवढ्याच फ्रीक्वेन्सीचा वापर केला जातो. याची अनेक कारणे आहेत. ऐकु येणार्‍या उच्च-नादातील गोडवा कायम न राहणे, उच्च-सुरांतील नाद भरकटलेला ठरणे, तारांतुन नीर्माण होणार्‍या ध्वनीचे परस्पर संतुलन बीघडणे, तारांच्या लांबीचे गणीत जुळवताना त्याच्या जाडीत केलेला बदल कायम अचुक न राहणे, . . . अशी अनेक कारणे आहेत.

पण महत्त्वाचे कारण वाद्यातुन नीर्माण होउन ''नीनादणार्‍या, घुमघुमणार्‍या, दुमदुमणार्‍या'' ध्वनीतील सुरेलपणाचे नाते, गायकाच्या सुरांशी जवळकी साधणारे असणे गरजेचे असते. अनेक वर्षांच्या अनुभवातुन जगभरच्या माननीय संगीतकारांनी याबाबत सुयोग्य नीर्णय घेउन गायकीच्या सामान्य ध्वनी-फ्रीक्वेन्सीच्या दोन्ही अंगांना आणखी केवळ दोन सप्तके पीयानोसाठी वाढवलेली उमगतात.

भारतीय संगीतातील गायकांनी वापरलेली सप्तके आणी पीयानो, हार्मोनीयम, गीटार, अशा पाश्चीमात्य वाद्यांतील सुरावट यातील सुरांत फरक असल्याने एकमेकांना साथ देताना अडचण नीर्माण होते. 240 फ्रीक्वेन्सीचा भारतीय गायकाचा मध्य-सप्तकातील 'सा' हा पीयोनोतील 261.626 पेक्षा जणु एका सुराने 'पडेल' ठरतो. वाद्यातील सुरावट आणी गायकाचा सुर यात एकजीनसी सुरेलपणा आणण्यासाठी वाद्यांतील सप्तकांना परीवर्तनशील तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे.

आधुनीक पेटी (हार्मोनीयम) मध्ये 'स्केल-चेंजर' नावाने प्रस्थापीत सामान्य चाव्यांना थोड्या चढेल वा पडेल सुरात वाजवीण्याची सोय दीलेली असते. पण तरीही अचुकतेने हवा तोच सुर 'सा' साठी हव्या त्याच नीयमीत बटणावर पोस्ट केलेला नसेल तर बोटांना लागलेली सुरावटीची सवय बदलणे वादकासाठी कठीण ठरते.

संगीतातील गायकी आणी वाद्यवृंद यांचा परस्पर संबंध अचुक सुरावटीतुन सहजपणे प्रस्थापीत करण्यासाठी गायकांच्या आणी वाद्य नीर्मीतीतल्या तंत्रज्ञांच्या गरजा जाणुन एकत्रीतपणे उपाययोजना आखणे मराठी-संगीतासाठी महत्त्वाचे ठरत आहे.

मराठीचे '''जडणघडण, व्यवस्थापन, व्याकरण''', 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/  ग्रुपवर क्रमवार मांडत आहे. त्यात 'गद्य, पद्य व संगीत' याबाबतची मराठीची 'जडणघडण' क्रमवार देत आहे. 'अवघा मराठी तीतुका मेळवुया, मराठमोळ्या मायमराठीला स्वतंत्र करुया' यासाठी सामील व्हा.

संपर्क साधा शुभानन गांगल
मोबाइल 9833102727
इमेल shubhanan.gangal@gmail.com

बुधवार, २१ मे, २०१४

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 47 – गद्यातुन देवनागरीच्या दोन-वेलांट्या दोन-उकार वापरुन मराठीने लेखनातील अप्रमाणीकरणाला आमंत्रण दीले.

युनिकोड ते साऊंडकोड लेख 47 –
गद्यातुन देवनागरीच्या दोन-वेलांट्या दोन-उकार वापरुन मराठीने लेखनातील अप्रमाणीकरणाला आमंत्रण दीले.

(नावे सोडुन लेखनात एक-वेलांटी एक-उकार वापरले आहेत, म्हणजेच शुद्धलेखन-नीयमावली झीडकारली आहे)

मराठीने गद्यातुन मोडी लीपी आणी पद्यातुन बाळबोध लीपी हजारो वर्षे वापरली. मोडी लीपीत एक-वेलांटी एक-उकार आहे. बाळबोध लीपीत दोन-वेलांट्या दोन-उकार आहेत. मराठीने गद्यासाठी एक लीपी व पद्यासाठी दुसरी लीपी का बरे वापरली? याचा वीचारही न करता प्रींटिंग टेक्नॉलॉजीचा स्वीकार करताना देवनागरीतील दोन-वेलांट्या व दोन-उकार वापरायला मराठीने सुरवात केली. याला व्याकरणीय पुरावा जोडण्यासाठी त्या काळातल्या संस्कृत-प्रचुर व्यक्तींना ब्रीटीश सरकारने हाताशी धरले. दादाजी पांडुरंग तर्खडकर या वीशीतल्या युवकाकडुन प्रसीद्ध केलेले संस्कृत-प्रचुर मराठीचे व्याकरण ग्राह्य मानुन सरकारने कलेक्टरचे फतवे, सरकारी फर्माने, कोर्टांचे नीर्णय, जमीनजुमल्याचे करारनामे देवनागरीतल्या दोन-वेलांट्या दोन-उकार वापरुन प्रसीद्ध करायला सुरवात केली. त्यावेळच्या सन्मानीय राजकारणी मराठी धुरंधरांनी काढलेली वर्तमानपत्रेही दोन-वेलांट्या दोन-उकार यांचा वापर सर्रास करु लागले कारण त्यांचा घनीष्ट संबंध संस्कृतशी होता. गद्यातुन दोन-वेलांट्या व दोन-उकार वापरणे हा पायंडा पडु लागला कारण त्याआधीच्या इतीहासात प्रींटीग झालेली पाने समाजाच्या हातात कधीच पडलेली नव्हती. प्रींटींग टेक्नॉलॉजीतील नावीन्याच्या नवलाइने हरखुन जाण्याचे ते दीवस होते.

गद्यातुन मोडी लीपीतल्या केवळ एक-वेलांटी एक-उकार यात वावरणार्‍या मराठीला, देवनागरीच्या दोन-वेलांट्या दोन-उकार यातुन वावरता, का बरे आले? हा महत्त्वाचा प्रश्न पडतो. होय ना? याचे साधेसुधे सरळ उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

गद्यासाठी शब्दांना दीलेला भाषीक अर्थ मराठी भाषा केवळ, नीव्वळ, फक्त त्यातल्या 'जातीगुणवैशीष्ट्य' या ध्वनी गुणधर्मातुन जाणते. 'इ' व 'ई' यातील आणी 'उ' व 'ऊ' यातील 'जातीगुणवैशीष्ट्य' एकच, समान व सारखे आहे. 'ई' व 'ऊ' यातुन दर्शवला जातो तो केवळ 'इ' व 'उ' यांना लेखनातुन स्पष्ट केलेला 'आ' उच्चाराएवढ्या दीर्घ-उच्चार-वेळेएवढा घ्यावयाचे 'कालमापन'. याचा संबंध मराठी शब्दातील अर्थ समजण्यासाठी कोणतीही बाधा आणत नाही.

उदाहरण – 'कुमुदिनिसाठी, कुमुदिनीसाठी, 'कुमुदीनिसाठी, कुमुदीनीसाठी, कुमूदिनिसाठी, कुमूदिनीसाठी, 'कुमूदीनिसाठी, कुमूदीनीसाठी, कूमुदिनिसाठी, कूमुदिनीसाठी, कूमुदीनिसाठी, कूमुदीनीसाठी, कूमूदिनिसाठी, कूमूदिनीसाठी, 'कूमूदीनिसाठी, कूमूदीनीसाठी' 'कुमुदिनिसाठि, कुमुदिनीसाठि, 'कुमुदीनिसाठि, कुमुदीनीसाठि, कुमूदिनिसाठि, कुमूदिनीसाठि, 'कुमूदीनिसाठि, कुमूदीनीसाठि, कूमुदिनिसाठि, कूमुदिनीसाठि, कूमुदीनिसाठि, कूमुदीनीसाठि, कूमूदिनिसाठि, कूमूदिनीसाठि, 'कूमूदीनिसाठि, कूमूदीनीसाठि' या बत्तीस शब्दांचा अर्थ मराठीसाठी एकच समान व सारखाच ठरतो.

गद्यासाठी या बत्तीस शब्दांत लेखनातील प्रमाणीकरण कसे घडवायचे? हा प्रश्न दोन-वेलांट्या दोन-उकार स्वीकारल्याने नीर्माण होतो. तेच जर मराठीच्या ''उपजत, मुलभुत, पारंपारीक, शास्त्रीय, नैसर्गीक, स्थीरतत्त्वानुसार'' गद्यात एक-वेलांटी एक-उकार स्वीकारले तर तो शब्द केवळ, नीव्वळ व फक्त ''कुमुदीनीसाठी'' असा एकाच प्रकारे लीहीता येतो व संपुर्ण शुद्ध-नीयमावली नेस्तनाबुत होउन मराठी गद्य लेखन आपोआप सहजसुलभ, सोपे, अचुक, शास्त्रीय, उपजत, मुलभुत व नैसर्गीक ठरते. कीती साधा सोपा मार्ग आहे हा ! आजच्या 'शुद्धलेखन नीयमावलीला' शीथील करत बसण्यापेक्षा, मराठीचा मराठीसाठी मराठीपणातुन वीचार करुन, एक-वेलांटी एक-उकार मराठी गद्यासाठी स्वीकारुन, 'शुद्धलेखन नीयमावली' कायमची नेस्तनाबुत केली, की बस्स !!

मोडी लीपीच्या काळात मराठी गद्य लेखनातील शब्दात आपोआप नीश्चीत व शंभर टक्के प्रमाणीकरण साधले जात होते कारण त्यात केवळ एक-वेलांटी एक-उकार होता. ब्रीटीशांच्या काळात, प्रींटींग टेक्नॉलॉजीच्या उदयाच्या काळातच मराठीचे पहीलेवहीले चुकीचे पुस्तकी व्याकरण सर कॅरी यांनी सन 1805 साली, महाराष्ट्रातील तज्ञ संस्कृत-पंडीतांना हाताशी धरुन प्रसीद्ध केले आणी त्यानंतर दादोबा पांडुरंग तर्खडकर (जन्म 9 मे 1814, मृत्यु 17 ऑक्टोबर 1882) यांनी ''महाराष्ट्र भाषेचे व्याकरण'' (पहिली आवृत्ती 1836) इंग्रजी सरकार तर्फे प्रसीद्ध केले.

तेव्हापासुन दोन-वेलांट्या दोन-उकार मराठीत वापरल्या जाउ लागल्या. मराठीने मराठीला बदलण्याचा अधीकार कोणालाही दीलेला नसताना या सर्व व्यक्तींनी दुसर्‍या भाषेचे व्याकरण (संस्कृतचे व्याकरण) मराठीत घुसडले आणी मराठीवरील संस्कृतच्या अत्याचाराची सुरवात झाली. त्याकाळी यासर्वांनी मराठीसाठी मराठीपणातुन मराठीपुरता वीचार केला असता तर मराठीला आजची दयनीय, केवीलवाणी, मानहानीची स्थीती भोगायला लागली नसती.

त्याकाळी प्रींटींग टेक्नॉलॉजीतुन मराठीला मीळणारे वैभव मराठीने गद्यातुन एक-वेलांटी एक-उकार वापरला असता तरी तेवढेच व तसेच मीळाले असते. त्यामुळे प्रींटींग टेक्नॉलॉजीतुन मराठीला मीळणारे वैभव देवनागरीतल्या दोन-वेलांट्या दोन-उकार यामुळे मीळाले असे मुळीच म्हणता येणार नाही. पण त्याकाळी मीळणार्‍या वीकासाचे श्रेय देवनागरीतील दोन-वेलांट्या दोन-उकार यांनाच जणु दीले गेले. सामान्यांना यातील बारकाव्याशी कोणतेही सोयर-सुतक नव्हते आणी 'माननीय पुढारी, लोकनेते, राजकीय धुरंधर, . . ' वगैरे सर्व व्यक्ती संस्कृत-प्रचुर कौटुंबीक व्यवस्थेतुन साकारल्या होत्या.

जगायचे मराठीत, वावरायचे मराठीत, व्यवहार करायचा मराठीत, पण संधान व बांधीलकी मात्र संस्कृतची, अशी मायमराठीच्या सजीवतेची चुकीची ठेवण, मांडणी, रीत नीर्माण झाली. जी आजपर्यंत तशीच सुरु आहे. हा अक्षम्य गुन्हा कळत की न कळत या सर्व माननीय व्यक्तींकडुन घडला गेला? याचा इतीहास बघणे गरजेचे नसुन आता यापुढे यातुन बाहेर येण्याचा आणी मराठीची 'उपजत, मुलभुत, पारंपारीक, शास्त्रीय व नैसर्गीक' स्थीरतत्त्वे जपण्यासाठीचा अचुक उपाय खंबीरपणे राबवीण्याची गरज आहे.

देवनागरी हा शब्द आजमीतीस 'स्क्रीप्ट' यानावाने युनीकोड माध्यमातुन जगभर प्रसीद्ध झाला आहे आणी त्याची व्याप्ती व संबंध ''संस्कृत, हिन्दी व मराठी'' या तीन्ही भाषेशी जोडला जात आहे. मराठीसाठी ''लीपी'' म्हणजे 'स्क्रीप्ट' नसुन, '''उच्चार, अक्षर, चीन्ह, लेखन, अर्थ''' यांचा संगम म्हणजे लीपी होय. मराठीचे हे स्वाभावीक अद्वीतीय अंतरंग सर्वांगांनी सामोरे येण्यासाठी मराठीने स्वतःच्या लीपीचे नाव 'मराठमोळी' असे जाहीर करणे ही मराठीच्या स्वतंत्र, स्वावलंबी, स्वाभीमानीपणाची पहीली पायरी ठरते.

समाजातील प्रत्येकाला ''ध्वनी, कागद व संगणक'' या तीन्ही माध्यमांतुन मुक्त, मनसोक्त, स्वच्छंदपणे वावरता येण्यासाठी, सर्व मराठी बोलींना आपापल्यापरीने वावरण्याची संधी मीळण्यासाठी आणी हे सारे करताना लेखनातील प्रमाणीकरण कोणताही नीयम न करता पाळता येण्यासाठी, मराठीने देवनागरीतच राहुन गद्यासाठी एक-वेलांटी एक-उकार वापरणे हा सहजसोपा मराठीच्या स्थीरतत्त्वांवर आधारलेला उपाय त्वरीत अमलात आणणे गरजेचे आहे.

यापुढे तरी मराठीने स्वतःची '''शास्त्रीय, नैसर्गीक, क्षेष्ठ, सक्षम, कुशल, सर्वसमावेशक, उपजत आणी मुलभुत''' ओळख जगाला करुन द्यावी. मराठीच्या वीचारापुढे कृपया, ''जात, पात, धर्म, पंथ, पक्ष, . . . वगैरे'' गोष्टी त्याज्य मानुन सर्वांनी 'सर्वसमावेशक मराठी' अशी भुमीका घ्यावी. जर आपण सर्वांनी ठरवले तर ही 'सर्वसमावेशक मराठी' भुमीका, या आधुनीक काळात, ज्ञानेश्वरांच्या मनातील वैश्वीक क्षीतीजापर्यंत, आपण मराठीला पोचवु शकु, याची मला खात्री वाटते. यातुन '''मराठीतील उपजत, मुलभुत, शास्त्रीय व नैसर्गीकपणाला साजेलसे '''जडणघडण, व्यवस्थापन, व्याकरण''', मराठीने मराठीचा मराठीसाठी मराठीपणातुन मराठीपुरतेच लिहीणे आवश्यक आहे''' या वीचारांना नीश्चीतता मीळते.

मराठीचे असे '''जडणघडण, व्यवस्थापन, व्याकरण''', 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/  ग्रुपवर क्रमवार मांडत आहे. 'अवघा मराठी तीतुका मेळवुया, मराठमोळ्या मायमराठीला स्वतंत्र करुया' यासाठी सामील व्हा.

संपर्क साधा शुभानन गांगल
मोबाइल 9833102727
इमेल shubhanan.gangal@gmail.com

रविवार, ४ मे, २०१४

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 46 – मराठी हाजीर हो ऽऽऽ - भाग 11

युनिकोड ते साऊंडकोड लेख 46 – मराठी हाजीर हो ऽऽऽ - भाग 11

(नावे सोडुन लेखनात एक-वेलांटी एक-उकार वापरले आहेत, म्हणजेच शुद्धलेखन-नीयमावली झीडकारली आहे)

काही वर्षांपुर्वी संस्कृत भाषेच्या व्याकरणाबाबतची माहीती हा अधीकार केवळ काही तज्ञ व्यक्तींच्याच मालकीचा असल्यासारखे घडत होते. आता याबाबत 'माहीतीचा अधीकार' हा नीयम वापरण्याचीही गरज नाही ! ! इंटरनेटवर संस्कृतच्या व्याकरणाबाबत पुरातन आणी नवीन अशी अगणीत माहीती उपलब्ध आहे. आजवर संस्कृतबाबत फारसा गौरव नसलेला, संस्कृतमधील तृटी दाखवणारा मजकुर, कोणीही प्रसीद्ध केला की संस्कृतचे अंधश्रद्धाळु भक्त 'कायहो, तुम्ही ........ हे पुस्तक वाचले आहे का?' असे वीचारीत. जर ते वाचले असेल तर मग पुन्हा दुसर्‍या पुस्तकाचे नाव सांगुन, 'कायहो, तुम्ही ........ हे पुस्तक वाचले आहे का?' असे वीचारीत असत. वीषयाला बगल देउन, वीषयातील ठरावीक भागावर सयुक्तीक चर्चा न करता, 'हे पुस्तक वाचले हे का?', असे विचारुन स्वतःच्या वीद्वत्तेचा देखावा करुन, दुसर्‍याला 'गप्प बसा' असा सल्ला देण्याचाच तो प्रकार वर्षानुवर्षे पाळला जात होता. एकुण काय 'संस्कृतचा केवळ गौरव करायला शीका, नाहीतर तोंडे बंद ठेवा' असा प्रकार होता. शास्त्रीयतेने वीचार करणार्‍या कोणाही व्यक्तीला त्यामुळे 'तोंड बंद ठेवावे' लागत होते.

मला लहानपणी आमचे शीक्षक आम्हाला व इतरांना मुक्तपणे सांगत, 'तुम्हाला मराठी भाषेबाबत नीट कळायला हवे असेल तर आधी संस्कृत शीका'. आता सामाजीक जागृतीमुळे शीक्षक वरील वीधान करत नाहीत. आता सामान्यपणे, 'मराठीच्या व्याकरणाच्या पुस्तकात दीलेले वाचा', असे उत्तर शीक्षक देतात! समजा कोणी वीद्यार्थ्याने त्यांना 'ए' हा संयुक्त-स्वर का? असे वीचारले तर 'व्याकरणात दीले आहे म्हणुन', असे गुरुजांचे उत्तर असते. 'पण अहो गुरुजी, जर 'ऐ' स्वरात असलेले 'अ' आणी 'इ' हे दोन स्वर आहेत हे उच्चारुन कळते, 'औ' स्वरात असलेले 'अ' आणी 'उ' हे दोन स्वर आहेत हे उच्चारुन कळते, तर 'ए' स्वरात असलेले तुम्ही सांगता ते दोन स्वर का ऐकु येत नाहीत?', असा प्रश्न वीद्यार्थ्याने गुरुजींना केला तर, बीच्चारे गुरुजी काय उत्तर देणार? 'उगाच भलते सलते प्रश्न वीचारु नका. मोठे झालात की ते कळेल', असे सांगुन त्यांना स्वतःचे अज्ञान लपवावे लागते.

'शारीरीक वाढ झाल्यावर ''काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर'' यातील बर्‍याच भागांची व्याप्ती नीट कळते कारण ते ज्ञान 'शारीरीक वाढीवर' अवलंबुन असते', याच वैद्यकीय-तंत्राचा उपयोग व वापर मुलांवर करुन ''मराठी-भाषा कळणे हे शारीरीक वाढीवर जोपासले जाते'' असे जणु ते सांगतात ! ! हे असे असते का? पण काय करणार? शीक्षकांना आपले अज्ञान मुलांपासुन लपवण्यासाठी हे सारे करावे लागते. यात त्या शीक्षकांचा दोष मुळीच नसुन एकुण समाजाने मराठी भाषेला कळत नकळत ''संस्कृत-भाषेचे गुलाम'' बनवील्याचा हा पडसाद व प्रतीसाद आहे. हे सार्‍या महाराष्ट्रात घडत आहे. याची कुठे बातमीही होत नाही, इतके ते स्वाभावीक ठरत आहे. माणसाला दोन हात, दोन पाय, दोन डोळे असतात इतकेच स्वाभावीक ''मराठी-भाषा संस्कृतची गुलाम व मांडलीक आहे'' हे ठरले आहे. का बरे असे घडले? स्वतःला मराठी म्हणुन घेणार्‍या स्वाभीमानी व्यक्तींनी आता तरी सत्य जाणुन घ्यायला नको का?

यापुढे तरी तुम्ही वीद्यार्थी असा वा शीक्षक तुम्हाला मराठी-पुस्तकी-व्याकरणातील अडलेले प्रश्न मुक्तपणे एकमेकांना वीचारायला शीका. 'आम्हाला व्याकरण फारसे माहीत नाही', हे पालुपद आजन्म जपण्यापेक्षा चौकसपणे त्याचा पाठपुरावा करा. त्यातुन संस्कृत-भाषेच्या प्रभावाचे धुके नीवळुन, मायमराठीचे उपजत व मुलभुत व्यक्तीमत्व प्रखरतेने सामोरे येइल.

'मराठी हाजीर हो ऽऽऽ' या उपक्रमातुन संस्कृत व मराठी यांची तुलना करत, उपजत व मुलभुत मराठी भाषा, संस्कृतपेक्षा सर्व बाबतीत ''भाषा'' म्हणुन कशी श्रेष्ठ आहे ते मांडत आहे. मराठीला श्रेष्ठ म्हटलेले अजुनही संस्कृत-भक्तांना आवडत नाही. पण माझा नाइलाज आहे कारण जे सत्य आहे ते मी कथन करत आहे. कोणाला आवडेल वा नावडेल यासाठी सत्य-स्वरुपाला शीथील करण्यापेक्षा रोखठोकपणे जे आहे ते तसेच मांडणे योग्य ठरते.

'मराठी हाजीर ऽऽऽ' या उपक्रमातुन संस्कृत भाषेशीच तुलना करावी लागत आहे कारण इतर कोणत्याही भाषेच्या व्याकरणाने मराठी-भाषेवर आक्रमण व अत्याचार केलेले नाहीत. केवळ संस्कृत-भाषेमुळे मराठीवर अमर्याद नामुश्की लादली गेली असल्याने संस्कृत भाषेशीच तुलना करणे क्रमपात्र ठरते. कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त वीस्तृत चर्चा होण्यासाठी या उपक्रमातील मजकुर जरा दीर्घ होत आहेत, याची जाणीव आहे. पण एखादा वीषय फारसा अपुरा न ठेवता, त्याची थोडीशी का होइना पण सर्व बाजुंनी चर्चा होणे गरजेचे ठरते, अन्यथा दीलेली माहीती अपुरी म्हणजेच चुकीची असल्याचा दोष पत्करावा लागतो. अर्थात कोणालाही कोणतीही वीस्तृत चर्चा करायची असेल तर त्यांनी मला जरुर भेटावे वा फोन करावा.

याचबरोबर कोणत्याही इतर भाषेचा उल्लेखही न करता, मराठीने मराठीचा मराठीसाठी मराठीपणातुन मराठीपुरताच वीचार करत मराठीची 'जडणघडण' हा उपक्रमही सादर करत आहे. मराठी भाषेने शैक्षणीक क्षेत्रात 'व्याकरण' या एकाच नावाने मराठी-भाषेचे उपजत मुलभुत अस्तीत्व शीकवणे अयोग्य ठरते. मुलांना त्यांच्या वयोमानाप्रमाणे आणी मराठी नव्याने वा प्राथमीक स्वरुपातुन शीकणार्‍या व्यक्तींना त्यांच्या आकलनाप्रमाणे मराठी शीकवणे योग्य ठरते. बाळांना जसे आपण 'दुध, कावळा, मांजर, कुत्रा' असे शब्द प्रथम न शीकवता त्यांना त्यांच्या आकलनाप्रमाणे प्रथम 'दुदु, काउ, माउ, भुभु' असे शब्द शीकवतो तसेच येथे आहे. त्यासाठी 'जडणघडण, व्यवस्थापन आणी व्याकरण' असे तीन भाग वा टप्पे नीर्माण केले आहेत. हे सर्व टप्पे वीवीधतेने तपासुन पुर्ण झालेले असले तरी तेही टप्प्या टप्प्यानेच सादर करणार आहे. कारण आज मराठीवर लादल्या गेलेल्या 'चुकीच्या पुस्तकी व्याकरण' आणी 'शुद्धलेखन नियमावली' यांच्या बर्‍याच काळातील सहवासामुळे समाजात नीर्माण झालेले गैरसमज व गृहीते टप्प्या टप्प्यानेच पुसुन नेस्तनाबुत करणे गरजेचे ठरते. 'जडणघडण' हा उपक्रम मात्र अगदी आटोपशीरपणे केवळ एकेका पानात मांडुन सादर करत आहे. त्याला गणीती पद्धतीचे 'प्रमेय' स्वरुप दीले आहे. एकेका प्रमेयातुन सीद्ध झालेला नीकष तळात देऊन मराठीची 'जडणघडण' सादर करत आहे.

'मराठी हाजीर हो ऽऽऽ' हा उपक्रम आणी 'जडणघडण' हा उपक्रम एकमेकांना पुरक आहेत. जर यापैकी कोणताही केवळ एकच सादर केला तर मनातल्या प्रश्नांना योग्य उत्तरे मीळणार नाहीत. 'मराठी हाजीर हो ऽऽऽ' हा उपक्रम वीश्लेषणात्मक व वर्णनात्मक म्हणता येइल तर 'जडणघडण' हा उपक्रम व्याख्यात्मक म्हणता येइल. 'जडणघडण' या उपक्रमातुन सादर केलेला परीसर चीत्रमय स्वरुपातुन अचुकपणे कसा शीकवावा हा भागही तयार असुन शालेय अभ्यासक्रमात तो सहजतेने आणता येइल. अर्थात त्याआधी आजचे ''पुस्तकी व्याकरण'' व ''शुद्धलेखन नियमावली'' पुर्णपणे नेस्तनाबुत करण्याची मानसीकता ठोसपणे नीर्माण होणे गरजेचे ठरते. त्यासाठीच क्रमाने 'मराठी हाजीर हो ऽऽऽ' हा उपक्रम आणी 'जडणघडण' हा उपक्रम सादर करत आहे.

याबाबतील मला लहानपणी ऐकलेली ''नावाडी आणी संस्कृत-पंडीत'' ही गोष्ट आठवते.

''''गंगा नदी एका तीरावरुन दुसर्‍या तीरावर पार करुन जाण्यासाठी एक संस्कृत-पंडीत बोटीत बसतात. संस्कृत-पंडीतांना स्वतःच्या वीद्वत्तेचा मोठा अभीमान व गर्व असतो. ते नावाड्याला वीचारतात, 'कायरे, तु ऋग्वेद वाचला आहेत का?'. बीच्चारा नावाडी 'नाही' म्हणतो. संस्कृत-पंडीत म्हणतात, 'म्हणजे तुझा पाव जन्म फुकट गेला. बरे तु यजुर्वेद तरी वाचलास का?'. बीच्चारा नावाडी 'नाही' म्हणतो. संस्कृत-पंडीत म्हणतात, 'म्हणजे तुझा अर्धा जन्म फुकट गेला. बरे तु सामवेद तरी वाचलास का?'. बीच्चारा नावाडी 'नाही' म्हणतो. संस्कृत-पंडीत म्हणतात, 'म्हणजे तुझा पाउण जन्म फुकट गेला'. तेवढ्यात वादळ येते. बोट हलायला, डुलायला लागते. नावाडी संस्कृत-पंडीतला विचारतो, 'काय हो, पोहता येते ना?'. संस्कृत-पंडीत 'नाही' म्हणतो. बोट बुडते. संस्कृत-पंडीत बुडतो. नावाडी मात्र पोहुन कीनार्‍याला सुखरुप परततो.''''

आजच्या 'चुकीच्या मराठी पुस्तकी व्याकरणाची' आणी 'शुद्धलेखन नियमावली'ची बोट, मराठीच्या संस्कृत-प्रचुर व्याकरणकारांसह बुडणार आहे आणी उपजत मुलभुत मायमराठी नव्या आधुनीक युगाच्या कीनार्‍यावर सुखरुपपणे पोचणार आहे. यात मला कोणतीही शंका नाही !

यापुढे तरी मराठीने स्वतःची '''शास्त्रीय, नैसर्गीक, क्षेष्ठ, सक्षम, कुशल, सर्वसमावेशक, उपजत आणी मुलभुत''' ओळख जगाला करुन द्यावी. मराठीच्या वीचारापुढे कृपया, ''जात, पात, धर्म, पंथ, पक्ष, . . . वगैरे'' गोष्टी त्याज्य मानुन सर्वांनी 'सर्वसमावेशक मराठी' अशी भुमीका घ्यावी.

जर आपण सर्वांनी ठरवले तर ही 'सर्वसमावेशक मराठी' भुमीका, या आधुनीक काळात, ज्ञानेश्वरांच्या मनातील वैश्वीक क्षीतीजापर्यंत, आपण मराठीला पोचवु शकु, याची मला खात्री वाटते.

'''मराठी हाजीर हो ऽऽऽ - भाग 11''' हा आहे संस्कृत व मराठी भाषा संदर्भातील '''मराठी हाजीर हो ऽऽऽ' आणी 'जडणघडण' या दोन उपक्रमांची  नीश्चीत गरज सांगणारा'' पहीला ठोस पुरावा.

यातुन '''मराठीतील उपजत, मुलभुत, शास्त्रीय व नैसर्गीकपणाला साजेलसे व्याकरण मराठीने मराठीचा मराठीसाठी मराठीपणातुन मराठीपुरतेच लिहीणे आवश्यक आहे''' या वीचारांना नीश्चीतता मीळते.

क्रमाक्रमाने असंख्य पुरावे सादर करत आहे.

या अभीयानाचे नाव आहे '''मराठी हाजीर हो ऽऽऽ'''. हा उपक्रम 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुक ग्रुपवर सादर होत आहे. सर्व मराठी प्रेमींनी यात जरुर सामील व्हावे. त्यासाठी 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/  ग्रुपवर 'अवघा मराठी तीतुका मेळवुया,  मराठमोळ्या मायमराठीला स्वतंत्र करुया' यासाठी सामील व्हा.

संपर्क साधा शुभानन गांगल
मोबाइल 9833102727
इमेल shubhanan.gangal@gmail.com