शिक्षक-पालक-बालक धडा 1 - नक्कल करत उच्चार करण्याची भावना वाढवणे
मुलांना अंगणवाडीत दोन वयानंतर घालतात. दुसर्या मुलांशी खेळायचे आणि एकमेकात
मिसळायचे हा महत्त्वाचा उद्देश त्यामागे असतो. त्याचवेळी खेळाच्या नादात त्यांना
स्वर उच्चार शिकवावेत. स्वर एकत्रितपणे मोठ्याने उच्चारण्याचा गमतीचा खेळ खेळता
खेळता, लहान मुलांच्याही नकळत मराठीच्या उच्चार शिक्षणाची सुरवात होते.
अंगणवाडीत घालण्याआधी, बाळांच्या जेवणाच्या वेळी त्यांना घास भरवताना, भरविण्यासाठी
हातात घेतलेला घास, जणू लांबून ‘अऽऽऽऽ’ म्हणत येत आहे असा अविर्भाव करून त्यांना
घास भरवा. त्यांना हा खेळ आवडतो. हा खेळ असल्याचे मानून बाळ भराभरा घास घेतात.
प्रथम ‘अऽऽऽऽ’ आणि नंतर ‘आऽऽऽऽ’ असे केवळ दोन उच्चार, घास भरविणार्या ‘आई, बाबा,
आजी, आजोबा, . . .’ यांनी करायचे. मुलांना ते उच्चार केवळ ऐकू द्यावे. त्यांना
उच्चार करायला सांगायचे नाही.
त्यातून काय घडते? बाळांच्या मनात ‘अ’ आणि ‘आ’ यांचे उच्चार कोरले जातात. नक्कल
करणे हा बाळांचा उपजत स्वभाव असतो. त्यांच्या कलेकलेने इतर वेळीही ‘अऽऽऽऽ’ आणि ‘आऽऽऽऽ’
त्यांच्यासमोर म्हणावेत. बाळांना जेव्हा त्याची नक्कल करण्याची स्फुर्ती येईल
तेव्हा त्यांनी तो कसाही उच्चारला तरी त्याला शाबासकी द्यायला विसरू नका.
बरोबर उच्चार केला की ‘आई, बाबा, आजी, आजोबा, . . .’ खुष होतात व शाबासकी
देतात हे त्याला कळते. यामुळे नक्कल करायची भावना बळावते.
बस्स्, हा झाला बाळांना मराठी भाषा शिकवण्याचा पहिला धडा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या अभिप्रायासोबत कृपया आपला ईमेल आणि मोबाईल जोडलात तर संपर्क साधायला सोपे पडेल.
आपला, शुभानन गांगल 9833102727