भाषा म्हणजे संवाद. लहानपणापासून बोलीभाषेतून आपण ओळखु लागतो आपले कुटूंब, अवतीभवतीचा परिसर, प्राणी व निसर्ग. त्यांना असतो शब्दांतून साकारणारा अर्थ. आपण व्यक्त करू लागतो जीवनावश्यक व्यवहारातील संवाद मराठी भाषेतून. मग अचानक सामोरी येते शाळा. आपल्याच वयाची मुले-मुली. अशा शालेय शिक्षणासाठीची सर्वांची भाषा हल्ली मराठी नसते. महाराष्ट्रात ती झाली आहे इंग्रजी. मग इंग्रजी भाषा, तिची लेखन चिन्हे, तिचे नवे शब्द, त्यातले नवे अर्थ याने सगळे जगच बदलल्यासारखे वाटते. आपल्या मराठी भाषेतून का बरे शिक्षण नाही? असा प्रश्न बाल मनाला पडतो. पण त्यावर नसतो उपाय मुलांकडे, पालकांकडे आणि शिक्षकांकडे. यामुळे काय होते? लहान मुलांच्या जिभेवर घडलेला असतो मराठीचा संस्कार पण हळुहळू इंग्रजी भाषेची नवी चिन्हे करतात डोळ्यांवर नवा संस्कार. मग काय घडते? जिभेवर असते मराठी आणि डोळ्यात साठते इंग्रजी. मराठी येते बोलता पण लिहीता येत नाही. इंग्रजी येते लिहीता पण बोलता येत नाही. मराठीचा मुलांच्या डोळ्यांवर त्यांना वाचता येईल एवढा तरी मराठी संस्कार करायला हवा का? त्यासाठी आम्ही तुम्हाला मोफत मदत करत आहोत. या ग्रुपवरून सर्व मदत मोफत मिळेल. शिक्षक, पालक व मुले यांना.
मनोगत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मनोगत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मंगळवार, ७ जानेवारी, २०१४
मनोगत
लेबल:
मनोगत
पत्ता - जुहू, मुंबई.
आयडियल अपार्टमेंटस, गुलमोहर रोड, जुहू, मुंबई.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)